top of page

'जडण-घडण' मासिकाविषयी संक्षिप्त माहिती 

सह्याद्री प्रकाशनाच्या वतीने गेली सतरा वर्षे शिक्षक-पालक आणि विद्यार्थ्यांसाठी 'जडण-घडण ' हे शैक्षणिक मासिक आम्ही पुण्यातून प्रकाशित करतो. सध्या महाराष्ट्रासह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, मणिपूर, दिल्ली या १२ राज्यांमध्ये 'जडण- घडण'चे वर्गणीदार आणि वाचक आहेत. तसेच 'जडण-घडण' च्या दिवाळी विशेषांकांना मुंबई मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, रोटरी क्लब इत्यादी मान्यवर संस्थांचे २३ पुरस्कार मिळाले आहेत. 

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मानद संपादकपद स्वीकारून 'जडण-घडण'च्या गुणवत्तापूर्ण प्रयत्नांना शाबासकी दिली आहे. तर ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, स्पर्धापरीक्षांच्या क्षेत्रातील महाराष्ट्रातील युवकांचे प्रेरणास्थान बनलेले अविनाश धर्माधिकारी ( I.A.S.), संत साहित्याचे ज्येष्ठ भाष्यकार डॉ. अशोक कामत, ज्येष्ठ संपादक व साहित्यिक विजय कुवळेकर, एम.के.सी.एल.चे चीफ मेंटॉर विवेक सावंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, फाय फाऊंडेशन पुरस्कारप्राप्त शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर आणि प्रयोगशील मुख्याध्यापिका व लेखिका रेणू दांडेकर, ज्येष्ठ भू-शास्त्रज्ञ डॉ. अनिलराज जगदाळे आदि मान्यवरांचा या मासिकाच्या निर्मितीमध्ये थेट सहयोग लाभला आहे. 

जानेवारी - २०११ पासून 'जडण-घडण' नव्या स्वरूपात प्रकाशित होत असून दर महिन्याचा ४८ ते ५६ पानांचा अंक, सुमारे १७५ ते २०० पानी दिवाळी विशेषांक आणि याशिवाय वर्षभरात अन्य एखादा विशेषांक असा आपणा सर्वांसाठी उपयुक्त आणि भरगच्च मजकूर असलेले एकूण ११ अंक पोस्टेजसह अवघ्या ६०० रुपयांमध्ये घरपोच दिले जातात. 

शिक्षण व्यवस्थेतील आणि आपल्या रोजच्या जगण्यातील प्रश्नांची मालिका कमी होण्याऐवजी रोज नव्यानं वाढतच आहे. अशा काळात दिग्गज आणि अनुभवी लेखकांचं शिक्षक, पालकांशी होणारं हितगुज, लहान मुलांसाठी उपयुक्त आणि मनोरंजक साहित्याचा खजिना, उच्च शिक्षणाकडं वाटचाल करणाऱ्या युवक-युवतींना करियरविषयक देण्यात येणारं मार्गदर्शन आणि एका स्वतंत्र, स्वावलंबी व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी - उभारणीसाठी द्यावयाची दिशा अशा नव्या स्वरूपातील भरगच्च मजकुराचा 'जडण- घडण'चा प्रत्येक अंक संग्राह्य ठरावा, वाचकांना उपयुक्त व्हावा असे आमचे तळमळीचे प्रयत्न सुरू आहेत. 

Sahyadri Prakashan 

Shop

Contact us 

To connect with us 

1st Floor

Sane Guruji Smarak

Near Dandekar Bridge

Pune 411030

020-24321511

+91-9850038859

+91-9850885936

+91-9356208296

Thanks for submitting!

© 2005 Sahyadri Prakashan, Pune. 
bottom of page